ॐ
ओम (ॐ) हे हिन्दु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.
ॐ ह्या आकारात पहिला अर्धा 'अ' आकार हे श्रीशंकराच्या ओठांचा आकार आहे. श्रीशंकराने फुंकर मारली, त्याने जे धुराचे वलय निर्माण झाले (सिगरेट फुंकल्यावर होते तसे), त्याचा आकार पहिल्या अर्ध्या 'अ'च्या पुढे वक्राकार आहे. ही आकाशगंगा होय. त्याच्या वर जो चंद्राकार आणि बिंदू आहेत, त्याचा अर्थ असा आहे कि, आकाशगंगेत सूर्य (तारे) आणि चंद्र (ताऱ्यांच्या भोवती असणारे त्यांचे ग्रह ) आहेत.
उत्पत्ती
याज्ञवल्क्य ऋषींच्या वक्तव्यावरून,ब्रह्मदेवाने पूूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे 'अ' ,'उ' आणि 'म्' हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा,विष्णू व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.
उच्चार आणि धार्मिक समज
ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चम्बू होतो. त्या चम्बूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारम्भ होतो. म् उच्चारतांना ओठ बन्द होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे.त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते. अ हा स्वर सर्वांत कोमल स्वर आहे, तसेच तो ओम्-कारातील आद्य स्वर आहे. त्यामुळे, 'अ' हा स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. उ हा मुखोत्पन्न (केवळ मुखातून निघालेला) सर्वाधिक तीव्र स्वर आहे. अर्थात, ती तीव्र शक्ती आहे. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी-देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या विष्णूचे स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. म् हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारले असता त्याआधील ध्वनीचा लोप होतो व वातावरण पुनः शान्त होते. हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ओम्-कार हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे असे हिन्दूधर्मात सांगितले आहे.
मंत्रस्वरूप
भगवान पतंजलीनी ओंकारासाठी प्रणव हा शब्द योजिला आहे. प्रणव म्हणजे भगवन्तासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओम हा तीन अक्षरांचा लघु मंत्रच आहे. याचा जप केल्याने जगाच्या सर्व दिव्य शक्तींचे स्मरण होते.
इतर अर्थ
छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा अर्थ 'अनुज्ञा' म्हणजेच स्वीकृती असा केला गेला आहे. जो ओंकाराचा स्वीकार करणे समजतो तो समृद्ध होतो.
पाणिनी मुनींनी ओंकाराचे अठरा अर्थ विदित केले आहेत. रक्षक, संचालक, द्युतिमान, प्रिय ......इत्यादी.
गुरू नानक यांनी 'इक ओंकार सतनाम' (ओंकार हेच खरे सत्य असे नाव आहे)अशी त्याची व्याख्या केली आहे.
सर्व वेद या पदाची घोषणा करतात, सर्व तपे ज्याच्याविषयी बोलतात , ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते पद ओम आहे असे म्हणले आहे.*
ॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे –
1) रोज ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपला शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होत असतो.
2) रोज ऊँ मंत्राचा जप केल्याने आपल्याला घशाच्या गळयाच्या समस्येपासुन (थायराँईडच्या) त्रासापासुन देखील आराम मिळत असतो.
3) रोज ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या शरीरातील रक्तभिसरणाची क्रिया देखील सुरळीत पार पडते.
4) ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या शरीरात,मनात आणि अवतीभोवती देखील सकारात्मक उर्जेचा संचार होऊ लागतो.
5) ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मनाची शांतता लाभते.
6) ऊँ ह्या मंत्राचे नामस्मरण केल्याने आपल्या मनाची एकाग्रता वाढते.आणि आपल्या स्मरणशक्तीत देखील वाढ होऊ लागते.
7) ऊँ ह्या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्याला असलेली निद्रानाशाची समस्या देखील दुर होते.
8) ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनात कुठलीही नकारात्मक भावना तसेच विचार येत नाही.
9)जर आपल्याला काही पोटाची तसेच रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपण सहज मात करू शकतो.
10) आपली पचनशक्ती देखील मजबूत होत असते.
11) ऊँ ह्या मंत्राचा केल्याने आपल्या मनातील भीती,क्रोध,अहंकार ह्या नकारात्मक भावना लोप पावतात.
ऊँ ह्या मंत्राचे महत्व –
● ऊँ ह्या एकाच ब्रम्हा,विष्णु महेश हे तिघे सामावलेले आहेत.
● ऊँ हा एक शब्द आपल्याला जगायची शक्ती प्रदान करतो.आपल्यात मोठमोठया आव्हाणांना पेलण्याचे त्यांना सामोरे जाण्याचे धाडस निर्माण करतो.
● ऊँ ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्यावर येणारे कुठलेही संकट पिडा दुर होत असते.
● आपल्या जीवणातील अडीअडचणी अडथळे दुर होतात.
● ह्या एका शब्दाच्या उच्चारणाने आपला आत्मा थेट परमात्मयाशी लीन होत असतो.
संदर्भ
- कठोपनिषद १.२